शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणाच्या पाॅकेटची शेतकऱ्यांनी केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात ...

चंद्रपूर : कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचाच फायदा घेत काही बियाणे कंपन्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. नुकतेच कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत ७० लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. एचटीबीटी कॉटन बियाण्यांचा निषेध म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या नेतृत्वात कार्यालय परिसरात बोगस बियाणे पाकिटांची शेतकऱ्यांनी होळी करत निषेध नोंदविला.

यावेळी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पी. आर. मडावी, कृषी सहाय्यक अनिल भोई, ढाकणे व शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी निविष्ठा केंद्र, कृषी केंद्र धारकांकडूनच मान्यताप्राप्त बियाणे अधिकृत पावतीसह खरेदी करावेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करू नये तसेच एखादी व्यक्ती अनाधिकृत कृषी निविष्ठा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तथा पोलीस विभागास कळवावे, असे आवाहन केले.

उपस्थित शेतकऱ्यांनी अनधिकृत कापूस बियाण्यांच्या पाकिटाची होळी करून निषेध व्यक्त केला. यापुढे अशाप्रकारची अनधिकृत व बोगस बियाण्यांचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.