शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे बांधकाम ठरले शेतकऱ्यांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे.

ठळक मुद्देरस्त्याची धूळ पांढºया सोन्यावर : ढिसाळ नियोजनाचा दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : उमरेड- चिमूर- वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गालगत असणाऱ्या शेती असणाºया शेतकºयांच्या शेतातील उभ्या पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने या धुळीने काळवंडत आहे. पावसाळ्याच्या काळात या महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याची ओरड ऐकायला मिळाली होती. सुरुवातीच्या काळापासून ढिसाळ नियोजनामुळे या महामार्गाचे काम शेतकऱ्यांना मारक ठरले आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे. यापैकी चिमूर-वरोरा हा मार्ग संबधित कंत्राट कंपनीने पूर्णत: खोदला आहे. या मार्गाचे कासवगतीने चौपदरीकरण सुरु आहे. वाहतुकीकरिता या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावरून मोठया प्रमाणात भरघाव वेगाने जडवाहनांची वाहतूक होत आहे. संबधित कंत्राट कंपनी या मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा करीत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. या मार्गालगतचे बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असल्याने ही धूळ शेतातील पांढऱ्या सोन्यावर बसत आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्याच्या काळात खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली या गावातील महामागार्लागतच्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीच्या चुकीमुळे उभ्या पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. याचा फटका शेतकºयांना बसला असून त्यांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. आता तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या कापूस पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने उडणारी धूळ बसत आहे. प्रत खराब झालेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी संतापले आहेत.नुकसान भरपाईची मागणीकंत्राट कंपनीच्या दुर्लक्षाने महामार्गालगतच्या अनेक पिकावर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रसासनाने या नुकसानीचा तातडीने सर्व्ह करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.अपघाताचे सत्र सुरूचमार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षीपासून सुरू आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता बांधकामासाठी गिट्टी व मुरूम ठिकठिकाणी टाकले असून मार्गावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. वाहन चालविताना संतुलन बिघडून अपघात होत आहेत. जागोजागी खोदकाम करून बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात टाकून ठेवले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग