शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन प्रकल्प रोजगारासाठी चांगली संधी

By admin | Updated: December 30, 2015 01:47 IST

मोहुर्ली वन परिक्षेत्रांतर्गत वन परिस्थितीकी समिती व वनविभाग यांच्या मार्फत सुरु असलेला पर्यटन प्रकल्प स्थानिकांना ...

स्वाधीन क्षेत्रीय : मोहुर्ली वन परिक्षेत्रातील पर्यटन प्रकल्पाला भेटचंद्रपूर : मोहुर्ली वन परिक्षेत्रांतर्गत वन परिस्थितीकी समिती व वनविभाग यांच्या मार्फत सुरु असलेला पर्यटन प्रकल्प स्थानिकांना रोजगारासाठी चांगली संधी असल्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांनी सांगितले. या प्रकल्पास नुकतीच मुख्य सचिवांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, उपसंचालक कळसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व स्थानिक वन अधिकारी उपस्थित होते.नवरगाव चौकी येथील आगरझरी वन पर्यटन रस्ता, अडेगाव-देवाडा वन पर्यटन रस्ता, देवाडा समितीमार्फत चालू असलेले भेट वस्तू दुकान व अडेगाव समितीमार्फत सुरु असलेल्या उपाहारगृहाची पाहणी यावेळी मुख्य सचिवांनी केली. सदर पर्यटन प्रकल्पात स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार मिळत असून समितीमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात गाव विकासासाठी निधी उपलब्ध होत असल्याबाबत मुख्य सचिवांना माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन गाव विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराची चांगली संधी देणारा हा प्रकल्प असल्याचे गौरवोद्गार क्षत्रिय काढले.या पर्यटन प्रकल्पास मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी विक्री केंद्रातून वस्तू खरेदी करून समितीचा उत्साह वाढविला होता. उपाहारगृहातून आतापर्यंत ४० हजारांची विक्री झाली असून भेट वस्तू दुकानातून ४५ हजारांची विक्री झाली आहे. या दोन्ही ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्य सचिवांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. नवरगाव चौकी येथील वन पर्यटन प्रकल्पात ६० युवकांना गाईड व जिप्सी चालकांना रोजगार मिळत आहे. गाईडला ३०० रुपये पर सफारी तर जिप्सी चालकांस एक हजार ५०० रुपये पर सफारी उत्पन्न मिळते. (प्रतिनिधी)