शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरच मित्रांनी गुंफले सोनेरी क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये पार्सल घेण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होती.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : दरवर्षीच्या गर्दीच्या ठिकाणी होती पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मैत्रीचा आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे मैत्रीदिन. दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात मैत्रीदिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात येत होता. मात्र कोरोनामुळे यावर्षी सर्व युवावर्गांना केवळ सोशल मीडियावरच मैत्रीदिन साजरा करावा लागला. जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जल्लोषात साजरा होणारा सण केवळ सोशल मीडियावर एकमेकांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देत अनेकांनी छायाचित्र, व्हिडीओ आणि खास संदेश पोस्ट करत मित्रांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये पार्सल घेण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होती.दरवर्षी मैत्रीदिनाला लहान मुले आणि तरुण एकमेकांना फ्रेंडशीप बँड बांधून शुभेच्छा देतात. यानिमित्त हॉटेल्स, कॅफे, महाविद्यालयाचे कट्टे, मॉल्स आणि चित्रपटगृह गर्दीने फुलत होती. पण यंदा लॉकडाऊनमुळे काहींनी व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाद्वारे मित्रांबरोबरच्या क्षणांना आठवणीचे शब्द दिले.व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम स्टेसवर मित्र-मैत्रिणींचे फोटो झळकत होते. काहींनी व्हिडिओ कॉल तर काहींनी लाईव्हद्वारे एकमेकांशी संवाद साधला. बालपण ते आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्व मित्रांना यानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुले आणि ज्येष्ठांनीही आपल्या मित्राशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मैत्रीदिनाचा हा जोश आणि जल्लोष सायंकाळपर्यंत कायम होता.जिल्ह्यातील पर्यटनस्थळी शांतताचंद्रपूर शहरातील जुनोना रोेड, अब्दुल कलाम आझाद गार्डन, रामाळा तलाव, बटर फ्लाय गार्डन, अजयपूर, मूल तालुक्यातील सोमनाथ, सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलाव, चिमूर तालुक्यातील धबधबा, कोरपना तालुक्यातील अमलनाला आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक-युवतींची गर्दी असायची. मोठ्या जल्लोषात मैत्रीदिन साजरा करायचे. मोठ्या प्रमाणात पार्टीसुद्वा करायचे मात्र कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळ बंद आहेत. तसेच प्रवासबंदीसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे मैत्रीदिन गजबजले असणारे सर्व पर्यटनस्थी यावर्षी शांतता दिसून आली.