शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरूवात चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन संघर्ष समितीचे खुशाल तेलंग, प्रा.एस.टी.चिकटे, अंकूश वाघमारे, प्रविण खोब्रागडे, गोपाळराव देवगडे, अ‍ॅड.सत्यजित उराडे, सिद्धार्थ वाघमारे, शंकरराव सागोरे, रमेशचंद्र राऊत, कैविशा मेश्राम, अश्विनी खोब्रागडे, राजेश वनकर, कुशल मेश्राम, जी.के.उपरे, भारत थुलकर, सुरेश नारनवरे यांनी केले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच कठोर शब्दात निषेध केला. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आजपर्यंतची सर्वच सरकारे दलितांवर होणारा अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे सांगत वक्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सभेनंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे, नगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, आदि मागण्या शिष्टमंडळाने निवेदनातून केल्या आहेत. (प्रतिनिधी)