शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावली तालुक्याला चार खासगी रुग्णवाहिका देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST

चंद्रपूर : ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सावली येथे ३९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावण्यात येणार आहेत. आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन ...

चंद्रपूर : ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सावली येथे ३९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावण्यात येणार आहेत. आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल. काही रुग्णांना गडचिरोली व चंद्रपूरला न्यावे लागते. मात्र, एकच रुग्णवाहिका असल्याने अडचणी येऊ नये, यासाठी स्वखर्चाने खासगी तत्त्वावर चार रुग्णवाहिका देणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सावली तहसील कार्यालयातील कोविड प्रतिबंधात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतीचे उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी उपाध्यक्ष नितीन दुधावर, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. यातून रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लांट व अन्य साहित्याची खरेदी केली जात आहे.

कोविड केअर सेंटरची पाहणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा, मूल येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पाहणी केली. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी ४८ आयसोलेशन, तर दोन ऑक्सिजन असे एकूण ५० बेड्स कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. सावली तालुक्यातील चक विरखल येथे तांगडे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.