शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी सरसावल्या निर्भया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे थकीत वेतन मिळावे म्हणून एसटी मधील कामगार संघटनेच्या निर्भया मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना राखी पाठवून पगाराची भेट मागणार आहेत.

ठळक मुद्देमंत्र्यांना राखी पौर्णिमेनिमित्त एसटी महिला कामगारांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे तोट्यात रुतलेले महामंडळाचे चाक आता आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे. फक्त जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे थकीत वेतन मिळावे म्हणून एसटी मधील कामगार संघटनेच्या निर्भया मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना राखी पाठवून पगाराची भेट मागणार आहेत.अल्प वेतनामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा यक्ष प्रश्न आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. यातूनच एसटीचे कर्मचारी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले आहे.देशात रक्षाबंधन सणाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून जीवनभर रक्षा करण्याची मागणी करत असते. तर भाऊ तितक्याच तत्परतेने बहिणीच्या रक्षणासाठी पुढे येऊन भेटसुद्धा देतो. याच सणाचे औचित्य साधून एसटी महामंडळाच्या आर्थिक कोंडीवर मार्ग काढून एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना राज्यातील एसटी कामगार संघटना समर्थित समितीच्या महिला कामगार राज्यातील प्रत्येक विभागातून मंत्र्यांना राखी व निवेदन पाठवणार आहेत.राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांच्या अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख मंत्री महोदयांना राखी आणि निवेदन पाठवणार आहेत. निवेदनाची दखल त्वरीत घेतली जावी, अशी विनंती महाराष्ट्रातील सर्व निर्भया आपल्या कुटुंबासहित करणार आहेत.-स्नेहलता वासनिकनिर्भया विभाग प्रमुख,चंद्रपूर विभाग, चिमूर आगार