शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेफाटकाखालून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: June 16, 2017 19:36 IST

नांदुरा येथील प्रकार : नागरिकांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ

सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: येथील रेल्वेफाटकाचे अंतर हे जमिनीपासून जास्त आहे. त्यामुळे येथून वाहने काढणे नागरिकांना सोपे जात आहे. परिणामी कुठलाही विचार न करता नागरिक दुचाकी काढून मोकळे होतात. हा प्रकार नागरिकांच्या स्वत:च्या जिवाशी खेळ करण्यासारखाच असल्याचे बोलल्या जात आहे. नांदुरा शहरातून मलकापूर-जळगाव जामोदकडे पोच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे यात दुचाकी चालकांची संख्या ही जास्त आहे. पण येथील नागपूर लाईनवरील रेल्वेफाटक प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे, रेल्वे येत आहे की नाही किंवा रेल्वे जवळ आली आहे याचा कुठलाही विचार न करता नागरिक वरूड येथे फाटकाखालून सरळ आपली दुचाकी काढून मोकळे होतात. या फाटकावर अंतर जास्त असल्याने अगदी थोडीशी दुचाकी झुकविली तरी ती बाहेर पडते. यामुळे रेल्वे फाटकाखालून वाहने काढण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. रेल्वे फाटकावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या ठळक अक्षरात थांबा असे लिहिलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता नियमांना तिलांजली देण्याचे काम दुचाकीचालक करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे.