शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 14, 2015 01:18 IST

मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे.

कर्जमाफीची मागणी : पाण्याअभावी धानपीक लागले करपायला पोंभूर्णा : मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्याचे रुपांतर तणसात झाले असल्याने यावर्षीची अल्पभूधारक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याचे चित्र दिसत आहे.परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी केली. महागडी खते घेतली. हातात होते नव्हते ते सगळे शेतीत झोकून देऊन मोठ्या मेहनतीने शेतकरी शेती करण्याच्या कामाला लागला होता. यावर्षी तरी धान्य भरभराटीने होवून लावलेला पैसा निघून उर्वरीत पैसे मुला- बाळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरकुटुंब चालविण्यासाठी शिल्लक राहतील, अशी आशा शेतकऱ्यांची होती. परंतु निसर्गाने यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. ऐन धानपीक हातामध्ये येण्याच्या क्षणात धानपिकावर अनेकविध रोगांनी हल्ला चढविला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.काही धानपीक तग धरुन असतानाच शेवटी एका पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाने दगा दिल्याने अखेर शेवटच्या टोकावर असलेल्या धान पीक करपून गेले आणि त्याचे आता तणसात रुपांतर झाले आहे. त्यामुळे संपूर्ण दिवाळी अंधारात केली आहे.दरवर्षी कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, त्यातच रोगराई यामुळे सतत नापिकीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. एकीकडे भारताचा कणा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या शेतकरी दादाचा पाठीचा कणा मोडायला लागला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्ष नाही. जर का जगाच्या या पोशिंद्याचाच कणा मोडेल तर या देशाची काय अवस्था होईल. यासाठी शासनाने ग्रामीण शेतकऱ्यांची होणारी दयनीय स्थिती दूर करण्यासाठी आर्थिक मदत करुन थकीत कर्ज माफ करावे. तेव्हाच त्यांचे खरे दिवाळीचे स्वप्न साकार होतील. (तालुका प्रतिनिधी)