शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड येथील शेतकऱ्याने सुरू केली विषमुक्त शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून प्रयोग : पिकविलेला शेतमाल हातोहाल विकला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी काही शेतकरी याला अपवाद आहेत. नागभीड येथील अरूण नरूले हे त्यापैकीच एक. मागील सहा वर्षांपासून सेंद्रीय शेतीचा प्रयोग करून त्यांनी आपली शेती विषमुक्त केली आहे.मागील सहा वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सुरु केले आहे. या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत धानाचे उत्पादन घेतले. आहे. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी पूर्णपणे शेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने त्यांनी उत्पादित केलेले तांदूळ हातोहात विकला जात आहे. नवीन काहीतरी करायचे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकर जागेवर लिंबू, शेवगा, आंबा व आवळ्याची लागवड केली आहे. तर एक एकर जागेवर कारले, वांगी, टमाटर, चवळी, ढेमसा आदी भाजीपाल्याचे पीक घेतले. भाजीपाल्याच्या पिकाचे त्यांचे हे पहिले वर्ष असल्याने पाहिजे तसे उत्पन्न आले नाही. त्याचबरोबर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही उपलब्ध झाली नाही. याही परिस्थितीत लागवड आणि खुरपणी खर्च वजा जाता ८ हजार रुपए महिना प्राप्त झाला. याशिवाय घरी विषमूक्त भाजीपाल्याचा वापर झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून नरूले यांच्या विषमुक्त भाजीपाला उत्पादनाची माहिती परिसरात झाल्याने अनेककजण त्यांच्या घरी जाऊन भाजीपाला विकत घेत आहेत. नरूले यांनी यावर्षी २ एकरामध्ये मुंगाचे उत्पादन घेतले. या दोन एकरात त्यांना १४ क्विंटल मूग झाले. यासाठीही रासायनिक खताचा वापर टाळला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी