शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बीपीएल, गावकरी एपीएल

By admin | Updated: May 1, 2015 01:15 IST

गोंडपिपरी तालुक्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील कन्हाळगाव जंगलव्याप्त परिसरात आहे.

आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील कन्हाळगाव जंगलव्याप्त परिसरात आहे. गावात आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणात असून गावकऱ्यांचा व्यवसाय शेती आहे. उन्हाचे चटके, पावसाच्या झळा सोसत जंगलात वास्तव्य करणारे गावकरी एपीएल यादीत आहेत. तर सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत चार भिंतीच्या आड निवांतपणे शासकीय कर्तव्य बजावणारे कर्मचारी मात्र बीपीएल यादीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.देशातील गरिबी निर्मूलनासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊले उचलले जात आहे. आर्थिक विषमता दूर व्हावी यासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे. दर दहा वर्षानंतर सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील गरीब व सधन कुटुंबाचे वर्गीकरण केले जाते. या सर्वेक्षणात जातीपातीच्या पलीकडे जावून कुटुंबाची सर्वकश माहिती गोळा केली जाते. दहा वर्षापुर्वी गोंडपिपरी तालुक्यातील अतिदुर्गम व मागासलेल्या कन्हाळगावचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. पुढे याच सर्वेक्षणाच्या आधारे या गावातील दारिद्रय रेषेखालील कुटुंब व सधन कुटुंबाची निवड शासकीय नियमानुसार करण्यात आली. कन्हाळगाव हे जंगलाच्या कुशीत वसलेले गाव असून या गावात अज्ञान वर्ग राहतो. येथे सुशिक्षीत वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना शासनाच्या विकासाचे धोरण व त्याच्या प्रक्रियेची पुरेपूर जाण असल्याने ही मंडळी आज १० वर्षानंतरही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. जेव्हा की, कन्हाळगावातील सुशिक्षित वर्ग हा तेथील कर्मचारी असून अज्ञान व असमजदार स्थानिक गावकरी आहे. मात्र हेच गावकरी आज गावातील सधन कुटुंबाच्या यादीत मोडत आहेत. येथील गठेलठ्ठ पगाराचे कर्मचाऱ्यांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश असल्याने ते बीपीएल क्रमांकाच्या आधारे शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र गरीब या योजनापासून कोसो दूर आहे. कन्हाळगावातील आदिवासीचे जीवनचक्र अजूनही चंद्रभोळ्या झोपडीत चालू आहे. हातावर आणून पाणावर खाण्यापर्यंतची त्याची आर्थिक स्थिती नाजूक असून केवळ बीपीएल यादीत आदिवासीच्या नावाचा समावेश नसल्याने ते आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक विकासाला मुकले आहेत. त्याची आर्थिक स्थिती डबघाईस आली असताना सुद्धा आर्थिक स्तर उंचावण्याचा कुठलाच मंत्र त्यांच्याकडे नाही. आर्थिक सर्वेक्षणाच्या वेळेला दहा वर्षापूर्वी सर्वेक्षक कधीच गावात पोहचलेला नसल्याची तक्रार गावकऱ्यानी केली आहे. गावातील आर्थिक स्थितीची तपासणी सर्वेक्षकांनी केली नसून केवळ कागदी घोडे नाचवून सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर केल्याचा आरोप सरपंच मंगला मडावी व उपसरपंच प्रदीप कुळमेथे यांनी केला आहे. अशातच आता दारिद्र्यरेषेचे सर्वेक्षण केवळ सरकारच्या भुलथापा ठरल्या आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शासनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. (वार्ताहर)