शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण

By admin | Updated: April 8, 2016 00:59 IST

जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेने एक नवी योजना अमलात आणली.

जिल्हा परिषदेची योजना : सतीश वारजूकर यांचा पुढाकारचंद्रपूर : जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेने एक नवी योजना अमलात आणली. बुधवारी चिमूर विधानसभा क्षेत्रातील दहा ग्रामपंचायतींना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या ट्रॅक्टरमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकासाचा निधी शिल्लक होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांना दिले. दरम्यान, या निधीचा फायदा थेट ग्रामपंचायतींना व्हावा, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी ग्रामपंचायतींना ट्रॅक्टर वितरित करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून यासाठी तयार केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून गावांची यादी सादर केली.बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते मुंबई ग्रामपंचायत जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० चे नियमाअंतर्गत चिमूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिमूर व नागभीड तालुक्यातील भिसी, उसेगाव, वाहनगाव, जवराबोडी, कवडशी डाक, मांगलगाव, आलेवाही, कोर्धा, बामणी, शंकरपूर या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. या ट्रॅक्टरसाठी जिल्हा परिषदेमधून ५ टक्के व्याज दराने १५ वर्षाच्या परतफेडीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीचे ट्रॅक्टर मिळाल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाही वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाला जि.प. पदाधिकारी, अधिकारी, संबंधित दहा गावातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)