शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग असतानाही स्थानिक युवक बेरोजगार

By admin | Updated: June 26, 2015 01:19 IST

आंध्र-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक उद्योग असूनही...

कोरपना : आंध्र-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक उद्योग असूनही लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या तालुक्यांचा समावेश आहे. राजुरा तालुक्यात एक सिमेंट उद्योग सात खुल्या व भूमिगत खाणी व तीन कोल वॉशिरीज आहेत. कोरपना तालुक्यात अल्ट्राटेक, माणिकगड व मुरली अ‍ॅग्रो सिमेंट उद्योग आहेत. परंतु जिवती व गोंडपिपरी तालुक्यात एकही उद्योग नसल्यामुळे हे तालुके औद्योगिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने असंतुलित आहेत. उद्योगासाठी विपुल प्रमाणात असलेला खनिजसाठा प्रचंड असल्यामुळे येथील उद्योगांनी बऱ्यापैकी बस्तान मांडले आहे. उद्योगासाठी लागणारी जमीन अतिशय अल्प मोबदला देऊन अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाला. कारखान्यातून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील क्षेत्र, जमिनी नापिक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. सिंचनासाठी बांधलेल्या जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाणी उद्योगांना पुरविल्या जात असल्यामुळे शेतसिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तरीही स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीयांचा भरणा उद्योगात केला जात आहे. बऱ्याच ठिकाणी स्फोटकाच्या वापर करून कोळसा काढत असल्याने परिसरातील घरांना भेगा पडू लागल्यामुळे जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. खुल्या खाणीमुळे कृत्रिम मातीचे ढिगारे निर्माण झाले. खुल्या वाहनाने कोळशाची वाहतूक होत असल्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणामुळे टि.बी. फुफ्फुसाचे आजार, दमा यासारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे. कोळसा धुण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा समस्या भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी शासनाने उद्योगावर कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. स्थानिकांना उद्योगात रोजगार मिळावा, पाणी टंचाई प्रश्न शासन स्तरावर सोडवावा, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या आहेत. (शहर प्रतिनिधी)