शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रेलाही जाण्यासाठी भोगाव्या लागतात मरणयातना

By admin | Updated: December 21, 2014 22:56 IST

राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून आठ वर्षांपासून त्या स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षापूर्वी बांधण्यात

विरुर स्टेशन : राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून आठ वर्षांपासून त्या स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या त्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून शासनाचा लाखोचा निधी व्यर्थ गेला आहे. सदर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना अंतिम संस्कार करण्यासाठी दोन किमी अंतरावर असलेल्या नदीवर जावे लागते. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना व मृताच्या आप्तेष्टांनाही मरणयातना भोगाव्या लागत आहे. शासनाने गाव तेथे स्मशानभूमी या उद्देशाने बहुतांश गावात स्मशानभूमीचे बांधकाम केले. परंतु स्मशानभूमीचे बांधकाम करताना भौगोलक परिस्थिती किंवा जागेची निवड करताना कोणतेच निकष पाळल्या गेले नाही. मिळेल त्या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी निरर्थक ठरत असून त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ ठरत आहे.आंध्र सीमेलगत असलेल्या विरूर गावात आठ वर्षापूर्वी नदीच्या काठावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेकरिता बोअरवेलसुद्धा बसविण्यात आलेली नाही. अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अनेक काटेरी झुडपे आहेत. तसेच पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या स्मशानभूमीत आठ वर्षांपासून एकही अंतिम संस्कार झाला नाही. स्मशानभूमीकडे कुणीही येत नसल्याने सध्या या स्मशानभूमीवरील छप्पर, लोखंडी शवदाहिनीसुद्धा गायब झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नाल्यावरील पाण्याचा ठणठणाट असतो. बोअरवेल नसल्याने जिथे पाणी उपलब्ध राहील तिथे अंतीम संस्कार होत असते. स्मशानभूमीचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने स्मशानभूमीला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. स्मशानभूमीच्या अनेक समस्येमुळे नागरिक येथे जाणे पसंत करीत नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. (वार्ताहर)