शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा महाविद्यालयांच्या प्रचार बॅनर्सची गर्दी

By admin | Updated: June 26, 2015 01:14 IST

शाळा- महाविद्यालय आणि प्रशिक्षणाचे विविध वर्ग सुरू होण्याच्या बेतात आहे व काही सुरुही झाले आहेत.

बल्लारपूर : शाळा- महाविद्यालय आणि प्रशिक्षणाचे विविध वर्ग सुरू होण्याच्या बेतात आहे व काही सुरुही झाले आहेत. या दरम्यान बहुतेक शाळा - महाविद्यालयांनी शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आपापल्या संस्थांच्या जाहिरातीचे बॅनर्स लावून बरीच गर्दी केली आहे. यामुळे सध्या सुटसुटीत दिसणारे शहर बॅनर्सने बरबटलेले दिसत आहे.दहावी आणि बारावीचा निकाल लागला आणि शाळांनी त्यांच्या शाळा- महाविद्यालयातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोसह बॅनर्स सर्वत्र लावण्याचा जणू सपाटाच सुरू केला आहे. यात, ज्यांना विद्यार्थ्यांचा तोटा नाही, असे म्हटले जाते. अशा इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळाही मागे राहिल्या नाहीत. आमचेच शाळा- महाविद्यालय कसे योग्य व विद्यार्थ्यांची काळजी घेणारे आहे, हे पटवून देण्याचा यातून साऱ्यांचा खटाटोप दिसतो आहे.शाळांची संख्या अमर्याद आणि विद्यार्थी मर्यादित अशी स्थिती आल्यामुळे शाळा- महाविद्यालयांना हे सारे करावे लागत असून गेल्या चार-पाच वर्षांपासून यात अधिक भर पडत आहे. यंदा बॅनर्सची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आढळत आहे.येथील नगर परिषद भवन चौक, रेल्वे चौक, गांधी पुतळा, बस स्थानक परिसर इत्यादी ठिकाणांवर अशा बॅनर्सची गर्दी झाली आहे. कसेही करा आणि विद्यार्थी मिळवा, अशी स्पर्धा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. त्याकरिता विद्यार्थी व पालक यांची मने वळविणे सुरू आहे. बॅनर्स प्रचार हा त्यातीलच एक भाग आहे. (तालुका प्रतिनिधी)