शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा । दुबार पेरणीचे संकट, रात्रीचा पाऊस दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृगाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामातील कपाशीची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका आहे. यंदाही अस्मानी संकटांनी शेतकरी भरडण्याची चिन्हे आहेत. शनिवारी रात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात. पुन्हा पाच दिवसात पाऊस आला नाही तर उसनवारी व कर्ज काढून पेरलेले महागडे बियाणे पुन्हा घ्यायला शेतकºयांकडे पैसा उरला नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, कढोली, मानोली, बाबापूर चार्ली, निर्ली, धिडशी, माथरा, गोयेगाव, अंतरगाव परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली. सध्या कपाशीचे बीज अंकुरण्याचा काळ असतानाच पाऊस गायब झाला. रात्रीला जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.कपाशी जमिनीतच करपण्याची भीतीकपाशी वाचविण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे काही खरे नाही. असा केविलवाणा सुर शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे ‘काळ्या आईच्या कुशीत पेरलेले बीज उमलू दे’ एवढीच इच्छा शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती