शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देनव्या २८ बाधितांची भर, जिल्हाधिकारी कार्यालयातील ११४ जणांचे स्वॅब घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णात वाढ होत आहे. असे असले तरी आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता. ही बाब जिल्हा प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी होती. अखेर शनिवारी चंद्रपूर येथील रहेमत नगरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यामध्ये शनिवारी आणखी २८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. आता एकूण बाधितसंख्या ५५१ झाली असून त्यापैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपर्कातील ११४ कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, याचा शोध सुरू आहे.आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतलेब्रह्मपुरी पंचायत समितीमधील एक पॉझिटिव्ह कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच दोनही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ जि. प. कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काल दिवसभर प्रवेशद्वार ताटकळत राहावे लागले. लोकप्रतिनिधीं तर जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नव्हते. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत कर्तव्यावर रुजू झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले.ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्यावरच भरजिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू झाली. मात्र शक्यतो ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्याकडेच शुक्रवारपासून भर दिला जात आहे. कुणीही व्यक्ती थेट कक्षात जावून संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिल्या. आज कार्यालयीन सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. सोमवारपासून दैनंदिन कामकाज सुरू झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या