शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विवाह सोहळ्यावरही आले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे.

ठळक मुद्देएप्रिल, मे महिन्यातील लग्न तिथी रद्द : वाजंत्र्यांसह अन्य व्यावसायिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूजन्य साथ आजाराने देशातच नव्हे तर जगात थैमान घातले आहे. परिणामी, जनजीवन ठप्प झाले असून, लग्न सोहळ्यावरही संक्रांत आली आहे. यामुळे वधू-वरांच्या पालकांना लग्न सोहळे रद्द करावे लागत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील तारखांच्या मुहूर्तावरील मंगल कार्यालयात केलेली बुकींग अनेकांनी रद्द केली आहे.पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे. मे महिन्यामध्ये एकून नऊ विवाह मुहूर्त आहेत. २, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ या लग्नतिथींच्या तारखा आहेत. त्यामुळे अनेक वधू-वर पालकांनी या तारखांमध्ये आपल्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयात बुकिंग केले होते. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे काही बुकिंग रद्द केली आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास जवळपास ५० ते ६० च्या आसपास मंगल कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयातील लग्नासाठी बुकिंग झालेल्या बहुतांश तारखा वधू-वर पालकांनी रद्द केल्या आहेत. लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांसह २० माणसांची अट असल्यामुळे बहुतांश पालकांनी यंदा होणारे लग्न पुढे ढकलले आहेत.लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत असला तरी वधू-वर पालकांनी जून महिन्यातीलही मंगल कार्यालयात केलेली बुकींगही रद्द करून यंदा लग्न नकोच म्हणून आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. तर काही जण मोचक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रशासनाची परवानगी घेऊन लग्नसोहळा उरकला जात आहे. त्यातच दुसऱ्या जिल्ह्यात लग्न असलेल्यांना तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने लग्न रद्द करणेच योग्य ठरत आहे.दोन महिन्यातल्या बुकिंग रद्दएप्रिल आणि मे महिन्याच्या सर्व तारखा लग्नसाठी बुकींग झाल्या होत्या. अनामत भरुन मंगल कार्यालय बुक केले होते मात्र कोरोनामुळे संबंधितांनी बुकींग रद्द केली आहे. यंदा या संकटामुळे आम्हाला महिन्याला पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. जून महिन्यातील तीन-चार तारखा बुक होत्या. मात्र त्याही रद्द होत असल्याचे संचालकाचे म्हणणे आहे.महिन्याला ५० लाखांचे नुकसानमंगल कार्यालयात होणारे लग्न सोहळे रद्द झाल्यामुळे कार्यालयांचे महिन्याला प्रत्येकी १० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. स्वयंपाकी, पुजारी, मंडप, लाईट, फुलवाले या सर्वांचे नुकसान झाली आहे. तसेच या सर्वांच्या अनुषंगाने मजुरांवरही उपासमारीची वेळ आहे.साथ द्या, कोरोनाला हरवाआधी कोरोना मुक्तीचा ध्या घ्या, शक्य असल्यास विवाह सोहळे पुढे ढकला, अन्यथा कुटुंबातच तेही १० लोकात आणि सामाजिक अंतर राखून विवाह उरका.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न