शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेसची घसरण

By admin | Updated: October 19, 2014 23:51 IST

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.

चंद्रपूर : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. गेल्या २००९ च्या विधानसभेत येथे तीन ठिकाणी काँग्रेस आणि तीन ठिकाणी भाजपा अशी समसमान स्थिती होती. यावेळी भाजपाची जागा एकने वाढली. शिवसेनेलाही वरोऱ्यात संधी मिळाली. काँग्रेसला राजुऱ्यात संधी होती. मात्र अगदी कमी फरकाने पक्षाला ही जागा गमवावी लागली. वरोरा, चंद्रपुरात तर काँंग्रेसचा उमेदवार अनपेक्षितपणे तिसऱ्या क्रमावर फेकला गेला. चिमुरातही संधी होती. पक्षाकडून योग्य नियोजन झाले असते तर, कदाचित चित्र वेगळे राहिले असते.
भाजपाने वरोऱ्यात केलेली राजकीय खेळी कामी आली. या खेळीने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केले. काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आणि दुसरे म्हणजे भाजपा उमेदवाराला या मतदार संघात दुसऱ्या स्थानावर पोहचविण्याची संधी संजय देवतळे यांना पुढे करून मिळविली. यात नुकसान काँग्रेसचे झाले आणि फायदा मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा झाला. गेल्या दोन निवडणुकांपासून सुरू असलेल्या बाळू धानोरकरांच्या प्रयत्नांची सार्थकता या निवडणुकीने केली. विशेष म्हणजे, संजय देवतळे यांच्या उमेदवारीने ती पूर्ण झाली.