शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या काहिलीने चंद्रपूरकर होरपळले

By admin | Updated: May 21, 2015 01:19 IST

‘हॉट सिटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. चंद्रपूरचे प्रदूषण आणि चंद्रपूरचा उन्हाळा इतरांना तर सोडाच खुद्द चंद्रपूरकरांनाही नकोसा होतो.

चंद्रपूरची ‘हॉट सिटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. चंद्रपूरचे प्रदूषण आणि चंद्रपूरचा उन्हाळा इतरांना तर सोडाच खुद्द चंद्रपूरकरांनाही नकोसा होतो. मात्र यावर्षी उन्हाळा लागल्यानंतर दीड महिना चंद्रपूरकरांना फारसे काही वाटले नाही. एप्रिल महिन्यात अनेकवेळा अवकाळी पावसाचे आगमन झाले. विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि ढगाळ वातावरण अनेक दिवस दिसून आले. त्यामुळे एरव्ही एप्रिल महिन्यात तापणारी ऊन यावेळी जाणवली नाही. त्यामुळे नागरिकही आनंदात होते. मे महिना चांगलाच तापेल, याची चंद्रपूरकरांना जाणीव होतीच. मात्र मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात दोनतीनदा अवकाळी पावसाचे आगमन झाले. काही दिवस सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत राहिले. त्यामुळे रखरखता मे महिनाही आला तरी नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली नाही. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपेक्षा काही दिवस लवकर येत असल्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा तापणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या चवीने चर्चा सुरू राहिली. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून सुर्याचा पारा चढू लागला आहे. परवा आणि काल तर सुर्याने जणू आगच ओकली असावी, असे वाटायला लागले होते. परवा म्हणजे, सोमवारी चंद्रपुरात कमाल ४५.८ तर किमान २८.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी पारा आणखी वाढला. या दिवशी कमाल ४६.८ तर किमान २८.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज तर कहरच झाला. सुर्याच्या पाऱ्याने आज बुधवारी ४७.४ अंशा पार मजल गाठून चंद्रपूरकरांना होरपळून टाकले. आज सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारी तर अंगाला अक्षरश: चटके बसू लागले होते. या उन्हामुळे सर्वच त्रस्त होते. (शहर प्रतिनिधी)आजचे सर्वाधिक तापमानयावर्षी उन्हाळा लागल्यापासून उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नव्हती.मात्र तीन दिवस सतत जिल्ह्यात तापमानात वाढ झाली. आज बुधवारी नोंदविलेले ४७.४ अंश सेल्सीयस तापमान यावर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.कुलरचा उपयोग नाहीउष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी घराघरात कुलर लावले आहेत. मात्र मंगळवार आणि बुधवारी सुर्याचा पारा चांगलाच चढल्याने घरातील कुलर काम करेनासे झाले आहे. कुलर लावूनही घरात गारवा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.