शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकतेसाठी उत्स्फूर्तपणे धावले चंद्रपूरकर

By admin | Updated: November 1, 2014 01:41 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.

चंद्रपूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमीत्याने आयोजीत ‘रन फॉर युनिटी’ दौडमध्ये चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, युवक- युवती, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व प्रशासकीय अधिकारी राष्ट्रीय एकतेसाठी उत्स्फूर्तपणे धावले.
दौडचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. दौडमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, आयुक्त (कस्टम) प्रिती चौधरी, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी, डॉक्टर, वकील व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभाग नोंदवला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला होता. त्यानिमित्त चंद्रपूर येथे रन फॉर युनिटी दौड घेण्यात आली. पोलीस मुख्यालय येथून सुरु झालेल्या दौडचा जटपूरा गेट मार्गे पोलीस मुख्यालय या ठिकाणी समारोप करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या दौडला हिरवी झेंडी दाखविली. दौडमध्ये वरिष्ठ नागरिक पुरुष, महिला, खुला गट व शाळकरी मुला-मुलींचा गट आदींनी सहभाग घेतला होता. दौड नंतर पोलीस परेड ग्राऊंड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पाजंली अर्पण करुन एकतेची सामूहीक शपथ घेण्यात आली. भारताची अखंडता व एकता आबाधीत ठेवण्यासाठी ही शपथ देण्यात आली.
पोलीस परेड ग्राऊंड येथून पोलीस परेड काढण्यात आली. जटपूरा गेट ते परत पोलीस परेड ग्राऊंड असे परेड संचालन करुन पोलीस विभागाने राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने वल्लभभाई पटेल यांना सलामी दिली.
राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, डॉक्टर, वकील, वनविभाग, इंडियन मेडिकल असोशिएशन, इकोप्रो, शाळा महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपविभागीय अधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक शेख व प्रशांत आर्वे यांनी स्पर्धेतच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निंबध, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान घेण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)