शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले

By साईनाथ कुचनकार | Updated: June 4, 2024 20:17 IST

Chandrapur Lok Sabha Results 2024 : मतदान केंद्रातून दुपारीच परतले कार्यकर्ते ; गिरणार चौकातील कार्यालयातही शुकशुकाट

Chandrapur Lok Sabha Results 2024 :चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीपासूनच ते पिछाडीवर होते. त्यामुळे भाजपा गोटामध्ये सकाळपासून शांतता असल्याचे दिसून आले. भाजपच्या गिरणार चौक परिसरातील कार्यालयात तसेच उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या घरीही शुकशुकाट होता. एरवी या दोन्ही ठिकाणी चहल-पहल असते. मात्र मंगळवारी दिवसभर एकदम शांत वातावरण होते. सुरक्षेच्या दृष्टीने मुनगंटीवार त्यांच्या घरासमोर पोलिसांनी सायंकाळच्या वेळी बॅरिकेट लावले होते.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना एक्झिट पोलचा अंदाज चुकतो, विजय आपलाच असल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पोस्टल बॅलेटच्या फेरीपासूनच सुधीर मुनगंटीवार हे मागे पडत गेले. हा मागे पडण्याचा क्रम शेवटच्या फेरीपर्यंत सुरूच होता. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये सकाळी एकत्र आलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी ११ नंतर घराकडे जायला लागले होते. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंतही मुनगंटीवार यांनी आघाडीच घेतली नसल्याने अनेकांनी मतमोजणी केंद्र सोडून घरी जाणे पसंत केले. दरम्यान, गिरणार चौक येथे असलेले भाजप कार्यालय तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या घरीसुद्धा शुकशुकाट बघायला मिळाला.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरMaharashtraमहाराष्ट्र