शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या म्हाडा कॉलनीतील घटना : दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निलेश गोटे या युवकांवर तीन ते चार जणांनी चाकूने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादावरून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर दोघेही रा. दाताळा (नवीन) अशी आरोपींची नावे आहेत. अंकित देहारकर, शुभम देहारकर व निलेश गोटे हे तिघेही चांगले मित्र होते. आरोपींनी निलेश गोटे याला उधारी पैसे दिले होते. मात्र गोटे हा पैसे परत करीत नव्हता. अशातच बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाताळा चौकात तिघांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यानंतर निलेश गोटे आपल्या म्हाडा कॉलनी येथील घरी निघून गेला. आरोपी अंकित व शुभम हेदेखील म्हाडा कॉलनीकडे गेले. यावेळी त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. अशात म्हाडा कॉलनी येथे त्यांनी निलेश गोटे याच्या घरासमोरच निलेशवर चाकूने हल्ला केला. हल्ला होत असताना निलेशचे वडील घटनास्थळी आले. हल्लेखोरांनी निलेशच्या अंगावर व मानेवर चाकूने गंभीर घाव केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी निलेशने आपल्या वडिलांना हल्लेखोरांचे नाव सांगितले. वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर अंकित बंडू देहारकर व शुभम सुधाकर देहारकर यांच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी केली.गुन्हेगारी वाढतेयमागील दोन महिने लॉकडाऊन होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तगडा होता. रात्री नागरिक घराबाहेर पडत नव्हते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही सायंकाळी ५ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र शांतता पसरते. लॉकडाऊन शिथिल असल्यामुळे पोलिसांचाही फारसा बंदोबस्त नसतो. त्यामुळे रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :Murderखून