शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणे भोवले; ३९ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

ठळक मुद्देसिंदेवाही नगरपंचायतीची कारवाई । आठ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : लॉकडाऊन शिथील केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या असूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे सिंदेवाही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी ३९ जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापूर्वी आठ व्यावसायिकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी डॉ. राठोड यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत, नगर पंचायतने मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या ३९ जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० याप्रमाणे सात हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.सर्व दुकाने ९ वाजता सुरु करुन ५ वाजता बंद करण्याचे निर्देश असताना अनेकजण ९ वाजतापूर्वीच सुरु करतात व पाच वाजतानंतरही सुरु ठेवतात. अशा व्यावसायिकांना नगरपंचायतीतर्फे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सूचनांचे पालन न केल्यामुळे शहरातील ८ व्यावसायिकांवर कारवाई करुन पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.सदर कारवाई मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या मार्गदर्शनाखली कार्यालयीन अधीक्षक पंकज आसेकर, सुधीर ठाकरे, विनोद काटकर, संतोष घडसे, पुरुषोत्तम खोब्रागडे, राजेंद्र नन्नावरे, संजय रामटेके, बोंडगुलवार, अमोल पाटील, मारभते आदींनी केली.नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असेलच तर घराबाहेर पडावे व मास्कचा वापर करावा. दिवसातून तीन ते चारदा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, रेड, झोन मधून आलेल्या नागरिकांनी आपली तापासणी करून घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळवून सहकार्य करावे.- डॉ. सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी,नगर पंचायत, सिंदेवाही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या