अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:50+5:30

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह कोरपना तालुक्यातील कोडसी, हेटी, तुकडोजी नगर येथील शेकडो विद्यार्थी नियमित प्रवास करतात.

And the students hang out every day until eight o'clock | अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात

अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात

Next
ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : रात्री करावा लागतो प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कोरपना येथून वणी शहराकडे जाण्यासाठी सांयकाळी ५.३०, ६.०० व ६.३० वाजताची बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोजच रात्री उशिरापर्यंत ताटकळत राहावे लागते आहे. यामुळे शेकडो पासधारक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने मंगळवारी वणी आगार प्रमुखाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह कोरपना तालुक्यातील कोडसी, हेटी, तुकडोजी नगर येथील शेकडो विद्यार्थी नियमित प्रवास करतात. मात्र दररोजच वणी मार्गावर निर्धारित वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त झाले आहेत. कोरपना ते वणी दरम्यान ही मोजक्याच बसेस चालत असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. याबाबत अनेकदा वणी व राजुरा आगाराचे लक्ष वेधूनही आगार व्यवस्थापकांनी लक्ष दिले नाही, असा आरोप पालकांनी केला. प्रवाशांची संख्या मोठी असतानाही कोरपना ते वणी दरम्यान बसेस कमी सोडण्याचा प्रकार सुरूच आहे. बसेस सोडल्या जात नसल्याने याचा फटका विद्यार्थी, महिला, वयोवृध्द मंडळींना बसत आहे. निंबाळा, गोवारी पारडी, मूर्ती, ही गावे मुख्य मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने रात्री विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याची मागणी गणेश गोडे, बाळू बोडखे, प्रमोद रामगीरवार, अतुल सिडाम, बंडू भगत, संतोष देरकर, शारिक सय्यद, राकेश ठेपाले, करण काकडे, रूपाली पिदुरकर, नितिषा ढवस, कैलास उइके, योगिता टेकाम, भूषण मोहितकर, साक्षी झाडे आदींनी केली.

Web Title: And the students hang out every day until eight o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.