शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांकडून शेगाव जि. प. शाळेची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

शेगाव जि. प. शाळेला शंभर वर्षे झाल्याने काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक झाले. अनेक विद्यार्थी जीवनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेतूनच त्यांनी आयुष्याची बाराखडी शिकली. पुढचे शिक्षक घेवून आयुष्यात प्रगती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे शाळेसाठी मदत करूया या भावनेने माजी विद्यार्थ्यांनी काही रक्कम जमा केली.

ठळक मुद्देकृतज्ञता, मोडकळीस आलेले स्वच्छतागृहही बांधून दिले

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (बु) : कोरोनाचा कहर सुरू असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद आहेत. शेगाव बु येथील शाळेचीही परिस्थिती अशीच आहे. अशावेळी शाळेसाठी काही मदत करता येईल, या भावनेने एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून थेट शाळा दुरूस्तीचा निर्णय घेतला. काम सुरू करून सामाजिक बांधिलकी परिचय दिला. हा नाविण्यपूर्ण उपक्रम वरोरा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.शेगाव जि. प. शाळेला शंभर वर्षे झाल्याने काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक झाले. अनेक विद्यार्थी जीवनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेतूनच त्यांनी आयुष्याची बाराखडी शिकली. पुढचे शिक्षक घेवून आयुष्यात प्रगती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे शाळेसाठी मदत करूया या भावनेने माजी विद्यार्थ्यांनी काही रक्कम जमा केली. त्या रक्कमेतून शाळेसाठी विद्युत फिटिंग व काही आवश्यक सामान घेऊन दिले.विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटनाबऱ्याचवेळाम मदतीसाठी सरकारकड बोट दाखविले जाते. मात्र,नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असते ही भावना माजी विद्यार्थ्यांमध्ये रूजली. यातूनच शाळेसाठी काही करू शकतो ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्ण होवू शकली. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांचेही योगदान मोठे आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना शेगाव येथील शाळेची दुरुस्त्या होवू शकली. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपणही मदत केली पाहिजे, हा विचार आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.शताब्दीनिमित्त करणार मदतशाळेच्या शताब्दी वर्षात पुन्हा जमेल तेवढी मदत देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. संस्काराची शाळा ही भावना त्यांच्या मनात आहे. शाळा जिल्हा परिषदेची असूनही मदत कशाला करायची, असा विचार विद्यार्थ्यांच्या मनाला शिवला नाही. मात्र, जिल्हा परिषद शाळेने आपल्या चांगले संस्कार केले. शिक्षकांनी वळण लावले. त्यामुळेच आपण काही देणे लागतो हा विचार त्यांनी कृतीत उतरवून दाखवला. त्यामुळे पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी