शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : प्रवेश प्रक्रिया सुरु, १७४२ बालकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीई आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला शाळास्तरावर २४ जूनपासून सुरूवात झाली. १५ दिवसांत एक हजार ७४२ पैकी आतापर्यंत ४१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. तर इतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.आरटीई प्रवेशासाठी यंदा शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणी केली आहे. त्यानुसार तात्पुरते प्रवेश दिले जात आहे. समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणीअंती प्रवेश निश्चित केले जात आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्क्े जागांवर प्रवेश देण्यात येतो.जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यस्तरावरून प्रवेशांची एकच लॉटरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. प्रवेशास पात्र ठरलेल्या पालकांच्या मोबाईलर एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र मध्यंतरी कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली होती.त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळास्तरावर प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. याबाबत शिक्षण विभागाकडून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासंदर्भात तारीख कळविली होती. त्यापैकी ४१३ बालकांचा प्रवेश झाल्याची आकडेवारी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.८७३ जणांना तात्पुरता प्रवेशअर्ज दाखल केलेल्या पात्र विद्यार्थ्यांपैकी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढलेल्या लॉटरीमध्ये सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी ८७३ जणांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. तर ४१३ बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तात्पुरात प्रवेश झालेल्या बालकांना लवकर निश्चित प्रवेश घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षण