शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील सहा दुकानांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली.

ठळक मुद्देसात दिवस राहणार बंद : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या सहा दुकानांवर मनपाने कारवाई केली. या सहाही दुकानांना पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी स्वत: आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात मनपा पथकाने केली.कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर यावी, याकरिता मागील काही दिवसांपासून यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. एकावेळी पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, दोन ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णत: स्वच्छता राखावी, यासारख्या अटी या लॉकडाऊन शिथिलता काळात पाळण्याचे दुकानदारांवर बंधन आहे. याबाबत मनपातर्फे वारंवार सूचना देण्यात आल्या आहे. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने आयुक्त राजेश मोहिते यांनी काही प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष तपासणी करून कडक कारवाई केली. यावेळी उपायुक्त गजानन बोकडे, आशिष मोरे, राहुल पंचबुद्धे, संतोष गर्गेलवार उपस्थित होते.ग्राहकांना बसू देणाऱ्या उपहारगृहांना दंडग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली. यात कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहात ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. काही ग्राहक नाश्ता करतानाही दिसून आले. त्यामुळे या दोन्ही उपहारगृहांवर कारवाई करण्यात आली.मनपाची मोहीमकोरोना प्रतिबंधासाठी दक्षता न पाळणाऱ्या व स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवितानाच लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. त्यानुसार विविध नियमांचे भंग करणाऱ्या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणाºया व्यक्तींना दंड आकारण्यात येत आहे.लॉकडाऊनमधे शिथिलता ही मंदावलेले आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी दिली गेली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेण्यात येऊ नये. मास्क घालणे, भौतिक दूरता पाळणे यासारख्या नियमांचे पालन व्हायलाच हवे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.- राजेश मोहिते,आयुक्त, मनपा, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या