शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

उमेद समूहाकडून ३.२५ लाख ‘मास्क’ उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले.

ठळक मुद्देमहिला समूहांची कामगिरी : दोन महिन्यात ५४ लाखांची आर्थिक उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमेद महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतील स्वयंसहायता समूहाने सुमारे ३.२५ लाख कापडी मास्क उत्पादन करून ५४ लाखांची आर्थिक उलाढाल केली आहे. टाळेबंदीच्या काळात केवळ मास्क विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करणारा एकमेव स्वयंसहायता समूह आहे.मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार समोर ठेवला होता. त्यामुळे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कापडी मास्क निर्मितीचे नियोजन केले. मास्क तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने तज्ज्ञ मंडळीकडून कापडाचा दर्जा आणि रचना याविषयी माहिती घेऊन मास्कचे उत्पादन करण्यात आले. विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिबंधक उपाय योजना असताना क्षेत्रकार्य करीत असल्याने विविध विभागांनी उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समूहांकडे मागणी केली. आजमितीस मास्क उत्पादनातून ५४ लाखांची उलाढाल झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वयंसहायता समूहाच्या या कार्याला प्रोत्साहन दिले. दर्जाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व नियोजनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा अभियान सहसंचालक शंकर किरवे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने तसेच तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी मोलाची भूमिका बजावली.८०० महिलांना रोजगारमागणीनुसार दुहेरी आणि तिहेरी कापड असलेले मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले. मार्च ते एप्रिल या महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने जिल्हाभरातील सुमारे २५० हून स्वयंसहायता समूहांनी दिवसरात्र एक करून मास्कची गरज पूर्ण केली. या माध्यमातून सुमारे ८०० हून अधिक महिलांना रोजगार मिळाला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील समूहांनी यात हिरिरीने सहभाग नोंदवून मास्क तयार केले.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग या शासकीय कार्यालयासोबतच स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने नोंदवलेल्या मागणीनुसार समूहांनी मास्क पुरविले. त्याचबरोबर चंद्रपूरनजीक असलेल्या खासगी विविध उद्योग कंपन्या, औषध दुकाने तसेच कापड विक्रेत्यांनीसुद्धा महिलांकडून कापडी मास्क खरेदी केली.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या