शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात २० टक्के जागा राखीव ठेवाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ३० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती ८० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती १० टक्के आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग १० टक्के वसतिगृहात आरक्षण होते.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघ : मागासवर्गीय वसतिगृह तयार होण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागासवर्गीय विभागाने वसतिगृहाची घोषणा केली. मात्र, वसतिगृह तयार होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात २० टक्के जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ३० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती ८० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती १० टक्के आणि इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग १० टक्के वसतिगृहात आरक्षण होते.इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्वतंत्र स्थापन झाल्यानंतर २१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार समाजकल्याण विभागाच्या सर्व वसतिगृहामध्ये ८० टक्के अनुसूचित जाती चे विद्यार्थी, ३ टक्के अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के विमुक्त जाती व भटक्या जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी, २ टक्के विशेष मागास प्रवर्गाचे विद्यार्थी, ३ टक्के अपंग विद्यार्थी, २ टक्के अनाथ विद्यार्थी, याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत. शैक्षणिक सत्र सुरू व्हायला वेळ आहे.मात्र, आतापासूनच सरकारने लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात २० टक्के जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वसतिगृहांची क्षमताही वाढवावीशासनाने ३० जानेवारी,२०१९ परिपत्रक काढून स्वतंत्र वसतिगृहाची घोषणा केली. मात्र, नवीन नियुक्त कर्मचारी व इमारती उभारणे अथवा भाड्याने घेण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहाची सुविधा होईपर्यंत समाजकल्याण विभाग अतंर्गत अस्तित्वात असलेले वसतिगृह व इमारतींची क्षमता वाढवून २० टक्के ओबीसी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याकरिता इतर मागासवर्गीय कल्याण विभागाने निधी पुरविल्यास इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सोय होऊन वसतिगृहाची प्रवेशाची समस्या दूर होईल, असेही निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती