JOB Alert : गुड न्यूज! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; जाणून घ्या, माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:39 IST2021-08-05T15:39:38+5:302021-08-05T15:39:59+5:30

BEL Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited recruitment ) तब्बल 511 जागांसाठी मोठी भरती होणार आहे.

JOB Alert sarkari naukri bharat electronics limited recruitment for engineer vacancy see details | JOB Alert : गुड न्यूज! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; जाणून घ्या, माहिती

JOB Alert : गुड न्यूज! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; जाणून घ्या, माहिती

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited recruitment ) इंजिनिअर्सच्या तब्बल 511 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ट्रेनी इंजिनिअर आणि प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 15 ऑगस्ट 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

'या' पदांसाठी भरती

ट्रेनी इंजिनिअर (Trainee Engineer)

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

जागा 

ट्रेनी इंजिनिअर - 308 

प्रोजेक्ट इंजिनिअर - 203 

शैक्षणिक पात्रता

-  BE/B.Tech ची डिग्री आणि अनुभवाच्या आधारावर मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. 

शुल्क

ट्रेनी इंजिनिअर - General/OBC/EWS: - 200 रुपये

प्रोजेक्ट इंजिनिअर - General/OBC/EWS: 500/ रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2021

या भरतीसाठी https://register.cbtexams.in/BEL/ExportManufacturing/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता करू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Read in English

Web Title: JOB Alert sarkari naukri bharat electronics limited recruitment for engineer vacancy see details