शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:21 IST

AIL Recruitment 2021: एअर इंडिया लिमिटेडमध्ये  (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. एअर इंडिया लिमिटेडमध्ये  (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे. एअर इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 30 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट airidia.in ला भेट देणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

जागा

बीपीओ टीम लीडर – 1 मॅनेजर (ट्रेड सेल्स) – 1 ऑफिसर / एएम सेल्स (सेल्स सपोर्ट अँड मार्केट एनालिस्ट) – 1 ऑफिसर / एएम (कस्टमर ग्रीवांस) -1 असिस्टेंट मॅनेजर/ डिप्टी मॅनेजर/ मॅनेजर – 5 स्टेशन मॅनेजर (रेस्ट ऑफ इंडिया) – 14 एजीएम (आयओसीसी) – 1 आयटी हेड – 1 एजीएम (मेडिकल सर्विस) – 1 सीनियर सुपरवायजर (मेडिकल) – 1 ग्राउंड इंस्ट्रक्टर – 3 

पात्रता

- बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 

- उमेदवाराला कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. 

- आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. 

- एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

एअर इंडियामधील रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करावा. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्जातील माहिती भरून अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर स्पीड पोस्टाद्वारे पाठवणं आवश्यक असेल.

निवड प्रक्रिया

मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी एअर इंडियाकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :jobनोकरीAir Indiaएअर इंडियाIndiaभारत