शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदे बंद करण्यासाठी महिला सरसावल्या

By admin | Updated: May 1, 2017 23:27 IST

अमडापूर : गावात वरली-मटका गुटखा, दारु व जुगार अड्डे आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध धंदे बंद करण्याचा ठराव १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये घेतला.

अमडापूर : गावात वरली-मटका गुटखा, दारु व जुगार अड्डे आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध धंदे बंद करण्याचा ठराव १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये घेतला. शिवाय यासंदर्भात मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनला दिले. अमडापूर येथील बसस्थानकासमोर परिसरात तसेच इंदिरानगर, आठवडी बाजार, प्रा. शाळेसमोर दारु, वरली-मटका, गुटखा विक्री, जुगार अड्डे यांसारखे अवैधधंदे जोमात सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास होत आहे. तसेच या दारुड्यांमुळे रस्त्याने जाणे -येणे कठीण आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी दारुड्यांमुळे नेहमी भांडण होत असल्यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे. घरातील कर्ता पुरुष, व्यसनाधिन झालेले घरात रोज भांडण वादविवाद होतात. त्यामुळे गावातील कित्येकाचे संसार उद्ध्वस्त होऊन राखरांगोळी होत आहे. शिवाय गावातील काही शाळकरी मुले वरली-मटक्याच्या नादी लागले आहे.गावातील हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत, गावात सुरु असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनातून केली. या निवेदनात अनसूया इरतकर, रूक्मिणी जुमडे, शीला माळोदे, आशा इंगळे, इंदु रामदास काळे, शोभा लोखंडे, अलका वानखेडे, इंदु लोखंडे यांच्यासह पन्नास महिलांनी ठाणेदार अमडापूर यांच्या स्वाक्षऱ्या असून, अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.