शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 10, 2014 23:33 IST

१0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत.

बुलडाणा : मृग नक्षत्राचा प्रारंभ ७ जून रोजी होतो. त्यामुळे पावसाळा अधिकृत सुरू झाला असे आपण म्हणतो. यावेळी मात्र पावसाचा अद्यापही पत्ता नाही. आज १0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत. आतापर्यंत ३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याही उलटण्याच्या स्थितीत असून, संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. दररोज आभाळ दाटून येते; पण पाऊस येत नसल्याने निराशेचेच ढग दाटून आले आहेत.
गेल्यावर्षी १0 जुलैपर्यंत ३५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावेळी ३९ टक्केपर्यंत पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात १ ते २ वेळा पावसाने तुरळक हजेरी लावली; मात्र मोताळा तालुक्यात आतापर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. अवर्षणप्रणव म्हणून घोषित असलेल्या मोताळा तालुक्याची स्थिती सर्वाधिक बिकट अशी आहे. सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव या परिसरात झालेल्या धूळपेरण्या उलटण्याच्या मार्गावर असून, मान्सूनपूर्व लावलेली कपाशी फक्त ठिबकच्या भरोशावर तग धरून आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठाही खालवत चालला असून, तीन मोठय़ा प्रकल्पातील जलसाठा ४0 टक्क्यापर्यंत, तर ७ मध्यम प्रकल्पातील जलसाठा २७ टक्क्यापर्यंत उतरला आहे. आता पिण्याच्या पाण्याचेही संकट घोंगावत आहे.

** येत्या चार दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता

जळगाव जामोद : हवामानाच्या अंदाजानुसार येत्या ३/४ दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाई न करता १८ जुलैपर्यंत पेरणीचे नियोजन करावे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचे पेरणीचे नियोजन पार कोलमडले असून, जवळपास पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटल्याने खरीप हंगामाचे कसे होणार, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड कोरड्या दुष्काळाची चिन्हे दिसत असताना भारतीय हवामान खाते पुणे यांच्या अंदाजानुसार कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. अनिल गाभणे, प्रा. संजय उमाळे यांनी ११ ते १६ जुलै या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविल्याने त्याचा शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु उशिरा का होईना खरीप हंगामाशिवाय कोरडवाहू शेतकरी कशाच्या भरवशावर आपली उपजीविका करणार, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तीच-ती पिके पेरल्यास नुकसानही संभवू शकते म्हणून आता शेतकर्‍यांनी उडीद, मूग, ज्वारी आणि बी.टी. कपाशी बियाण्यांची पेरणी करू नये कारण खोडकिडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होते. त्याऐवजी शेतकर्‍यांनी लवकर येणार्‍या देशी व सरळ वाणाचा वापर पेरणीसाठी करावा. शिफारशीपेक्षा २0 टक्के बियाणे जास्त वापरून दोन ओळीतील अंतर कमी करुन झाडांची संख्या वाढविली पाहिजे. त्याचप्रमाणे मका, सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. जिल्ह्यात पावसाची हजेरी जिल्ह्यातील लोणार, सुलतानपूर व दुसरबीड परिसरात काल पावसाने तुरळक हजेरी लावली होती. आज मलकापूर, खामगाव, बुलडाणा परिसरात पाऊस झाला त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संध्याकाळी बुलडाणा शहर व परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्याने नवी उमेद निर्माण झाली आहे. दररोज ढग दाटून येतात; मात्र पाऊस येत नसल्याने जिल्हाभर निराशेचे ढग जमा झाले आहेत.