शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भोनमधील पुरातत्व अवशेषांच्या जतनासाठी ठोस निर्णयाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:23 IST

Archeological Survey News पुर्णा नदीवरील बांध, मानवी वस्ती तथा पुरातन स्थळांचे नव्याने उत्खनन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देस्तुप व अवशेषांचे जतन करण्यासाठी ठोस निर्णयाची  अद्यापही प्रतीक्षाच आहे. सांस्कृतिक विभागाकडेही यासंदर्भात  पाठपुरावा होण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी प्रगत संस्कृती वास्तव्यास असलेल्या आणि सम्राट अशोकाच्या कालखंडातील प्रसिद्ध असलेल्या भोन बोन येथील बौद्ध स्तुप व अवशेषांचे जतन करण्यासाठी ठोस निर्णयाची  अद्यापही प्रतीक्षाच आहे.     सप्टेंबर २०२० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अनुषंगीक विषयान्वये एक बैठक घेण्यात आली होती. त्यात भोन येथील या पुरातत्व अवशेषांच्या जतनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती. जलसंपदा विभागानेही त्यानुषंगाने तातडीने २५ लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती;मात्र पुरातत्व विभागास त्यासाठी प्रारंभीक स्तरावर पाच कोटी रुपयांची अवश्यकता होती. त्यातच पुरातत्व विभागाच्या वरिष्ठस्तरावरून परवानगी मिळाल्याशिवाय जलसंपदा विभागाने देवू केलेला निधी पुरातत्व विभागास स्वीकारता आला नाही. विशेष म्हणजे जिगाव प्रकल्पातंर्गत बोन हे गाव पुर्णत: बुडीत क्षेत्रात जात आहे. येथे स्तुप परिसर, अडीच हजार वर्षापूर्वीचे कालवे, विटांचा त्या काळातील पुर्णा नदीवरील बांध, मानवी वस्ती तथा पुरातन स्थळांचे नव्याने उत्खनन करावे लागणार आहे. हे अवशेष शास्त्रीय पद्धतीने नोंदणीकृत करून त्याचा विस्तृत आराखडा पुरातत्व विभागाला करावा लागणार आहे. त्यानुषंगाने आता या प्रश्नी हालचाली होण्याची गरज आहे. जानेवारी २०२० मध्येही या संदर्भाने एक बैठक झाली होती. त्यामध्ये पुरातत्व विभाग, जलसंपदा विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या समन्वयातून येथील पुरा अवशेषांचे टप्प्या टप्याने नियोजीत जागेवर मुळ स्थापत्याप्रमाणे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सप्टेंबरमध्ये प्रशासकीय पातळीवर विचारमंथन सुरू झाले होते. अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या विषयान्वये बैठकही घेतली होती.दरम्यान, पुरातत्व विभागाने यादृष्टीने निर्णय घेण्याची अवश्यकता आहे. जलसंपदा विभागही या बाबत सकारात्मक आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वरिष्ठस्तावरून हा विषय हाताळण्यात येत असल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या विषयावर अपेक्षीत ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे. सांस्कृतिक विभागाकडेही यासंदर्भात  पाठपुरावा होण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा