शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल एक्स्प्रेस ३ जुलैला धावणार

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

वारकर्‍यांचा संभ्रम दूर : आषाढी एकादशी १0 दिवसांवर

खामगाव: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी खामगाव व अमरावती येथून सोडण्यात येणार्‍या ह्यविठ्ठल दर्शन एक्स्प्रेसचे वेळापत्रक आज जाहीर झाले. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केल्यानुसार ३ जुलै रोजी खामगाव येथून पहिली फेरी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असतानाही अमरावती व खामगाव येथून जाणार्‍या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. त्यामुळे या एक्स्प्रेसला यावर्षी हिरवी झेंडी मिळणार की नाही, असा संभ्रम भाविकांमध्ये निर्माण झाला होता; मात्र आज उशिरा रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ३ जुलैला खामगाव येथून पहिली फेरी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवस प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे चार फेर्‍या विठ्ठल दर्शनाच्या धावणार आहेत. दरवर्षी पंढरपूर येथील आषाढी एकादशीची वारी करणार्‍या भाविकांची संख्या हजारोच्या घरात असते. त्यामुळे विदर्भातील भाविकांना पंढरीची वारी करता यावी, यासाठी स्व.रमेश कांडेकर व जलंब रेल्वे प्रवासी सेवा संघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खामगाव तसेच अमरावती येथून पंढरपूर यात्रेसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. या ह्यपंढरपूर दर्शनह्ण यात्रा स्पेशल रेल्वेला ११ वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी या विठ्ठल दर्शन यात्रा स्पेशल गाडीवर भाविकांची गर्दी वाढतच आहे. या माध्यमातून रेल्वेला लाखो रुपयांचे उत्पन्नसुद्धा मिळते. तर भाविकांना एस.टी.बसच्या तुलनेत रेल्वेने आरामदायी व स्वस्त प्रवास मिळत असल्याने भाविकांची यात्राही आरामदायी व सुखद होते. या ह्यविठ्ठल दर्शन एक्स्प्रेसनेह्ण पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची वाढलेली संख्या पाहता खामगाव व अमरावती येथून एकूण १९ बोगीची एक्स्प्रेसच्या फेर्‍या वाढवून आता त्या चार करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी १९ जुलै रोजी झालेल्या आषाढी एकादशीमुळे या एक्स्प्रेसची पहिली फेरी १३ जुलै रोजी, दुसरी १४ जुलै, तिसरी १६ तर चवथी १७ रोजी सोडण्यात आली होती; मात्र यावर्षी आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असताना रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.