शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक १७ ला

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका १७ जुलै रोजी.

बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदूरा, जळगाव जामोद, चिखली, मेहकर व देऊळगाव राजा येथील नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका १७ जुलै रोजी होत असुन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी आज निवडणुक प्रक्रिया जाहिर केली.
या निवडणुकीसाठी १0 जुलै रोजी सकाळी १0 ते दुपारी २ वाजेपयर्ंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. ११ जुलै रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी दुपारी २ वाजेपयर्ंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता आयोजित नगरपालिकांच्या विशेष सभेत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी वाचून दाखविण्यात येणार असून, आवश्यक असल्यास निवडणूक घेण्यात येणार आहे.

*काँग्रेस-राष्ट्रवादी साथसाथ
बुलडाणा गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यभरातील विविध नगरपालीकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपा व शिवसेनेसोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली होती. ही अभ्रद युती आता संपूष्टात आली असुन आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे व राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पत्रक काढून दोन्ही काँग्रेस पालीकांमध्ये सोबत राहतील असे नमूद करून सदस्यांसाठी व्हीप जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यभरात १९६ पालीकांमध्ये सध्या नगराध्यक्ष निवडणुकींचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन सध्या सर्वत्र राजकारण तापले आहे. राज्या तील जवळपास २५ पालीकांमध्ये पालीकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने एकमेकांना धडा शिकविण्यासाठी सेना भाजपा सोबत सत्ता स्थापन केल्या आहेत. आता बुलडाणा व खामगाव मध्ये आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.