शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतनगरीत आषाढी एकादशी उत्सव वैष्णवांचा मेळा

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

विठ्ठलाच्या नामघोषासह गजाननाच्या गजराने संत नगरी शेगाव बुधवारी दुमदुमून गेली.

गजानन कलोरे / शेगाव
विठ्ठलाच्या नामघोषासह गजाननाच्या गजराने संत नगरी शेगाव बुधवारी दुमदुमून गेली. संत गजाननाच्या पालखीची परिक्रमा सुरू होताच, पावसाचे आगमन झाल्याने संत नगरीत जमलेल्या दीड लाख वैष्णवांच्या आनंदात भर पडली. आपली वारी कृतार्थ झाल्याचे समाधान वारकर्‍यांमधून व्यक्त झाले.
बुधवारी दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीतील श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. उपस्थित विश्‍वस्तांनीही श्रींची पूजा केली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात श्रींची पालखी गज, अश्‍व आदी राजवैभवी थाटात नगर परिक्रमेकरिता निघाली. संतनगरीत गत दोन दिवसांपासून भजनी दिंड्यांचे आगमन सुरू होते. भजनी दिंड्यांना श्री गजानन महाराज संस्थानमधून महाप्रसाद देण्यात आला. श्रींच्या पालखीसमवेत संस्थानचे विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ गुरूजी, अभियांत्रिकी कॉलेजचे रामेश्‍वर काठोळे, शरद शिंदे, मधुकर घाटोळ, प्राचार्य सोमाणी आदी सहभागी झाले होते. फुलवाले ढवळे यांनी श्रींच्या मेण्यावर फुलाची चादर भेट दिली.
जुने महादेव मंदिराजवळ वारकर्‍यांना पांडे परिवाराच्यावतीने तसेच खडकावरील भक्त मंडळीकडून चहा देण्यात आला. संस्थानचे विश्‍वस्त किशोरबाबू टांक यांच्यावतीने आरा मशिनजवळ चहा देण्यात आला. जळगाव जामोद येथील सहाशेपेक्षा जास्त श्री गजानन भक्तांची जळगाव जामोद ते शेगाव पायदळ वारी दशमीला आली होती. माहेश्‍वरी भवन येथे दिंडी वारकर्‍यांना स्थानिक सुलताने व मित्र मंडळाने महाप्रसाद दिला.
*श्रींच्या पंढरपूर शाखेतही उत्सव
पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखा कार्यालयात आलेल्या सर्व वारकर्‍यांना दशमी, एकादशी व बारस असा तीन दिवस महाप्रसाद वितरीत करणे सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्रींच्या शाखेत ८ एकरात अडीच ते तीन लाख वारकर्‍यांचे मिष्ठान्नासह महाप्रसादाचे वितरण करून सेवार्पण होऊ घातली आहे. याकरिता संस्थानच्या पंढरपूर शाखेत शेगाव संस्थान येथून पाठविण्यात आलेला तांदूळ १८0 क्विंटल, साबुदाणा १३0 िक्वंटल, शेंगदाणे २0 क्विंटल, डालडा ९0 डबे, तेल ९0 डबे, बटाटा ५0 क्विंटल आदी साहित्यासह महाप्रसाद वितरीत करणे सुरू आहे.
फराळासोबत १५ टन केळीसुद्धा पाठविण्यात आली. वारकर्‍यांच्या सेवेकरिता एक हजार सेवाधारी सेवा देत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रा तील २00 भजनी दिंड्यांना भजनी साहित्य, १0 टाळ जोड, वीणा, मृदंग, संत साहित्याचे वितरण करण्यात आले.