शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन फुटाच्या सवलतीत १३२0 मालमत्ता सुरक्षित

By admin | Updated: July 9, 2014 00:01 IST

जुन्या वस्तीचा रस्ता दोन ुफुटाने कमी करण्याचा निर्णय महत्वाचा ठरला आहे.

प्रमोद आहेर, शिर्डी
सार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने शिर्डीला पंढरपूर इतकेच महत्व आहे़ सार्इंच्या मंदिरात रोज गायल्या जाणाऱ्या‘ शिर्डी माझे पंढरपूर’ या संतकवी दासगणू लिखित आरतीने रोज भाविकांना याची अनुभूती होते़ आषाढी एकादशीनिमित्त ‘साई-विठ्ठला’ची साईनगरीत सजवलेल्या पालखीतून शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात
येते़
संत दासगणूंना बाबांनी विठ्ठल स्वरूपात दर्शन दिल्याचा साईसच्चरित्रात उल्लेख आढळतो़ बाबांच्या काळापासून द्वारकामाईत हा उत्सव साजरा होतो़ यादिवशी पहाटे मंगलस्रानानंतर सार्इंच्या समाधीवरील मूर्तीवर पुष्पहाराच्या बरोबर तुळशीचा हार घातला जातो़ तसेच ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीच्या वेळी साबुदाण्याच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो़
माध्यान्ह आरतीच्या वेळीही फराळाच्या पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो़ या आरतीच्या वेळी समाधीच्या चौथऱ्यावर पांडुरंगाचा फोटो ठेवला जातो़ सूर्यास्ताला धुपारतीच्या वेळी ‘युगे अठ्ठावीस़़़’ही पांडुरंगाची आरती म्हटली जाते़ धुपारतीनंतर सार्इंच्या पादुका, सटका समाधीच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी ठेवण्यात येतो़
रात्री साडेआठ वाजता ग्रामस्थ भजनी मंडळ भजन सुरू करतात़ रात्री सव्वा नऊ वाजता सार्इंचा व पांडुरंगाचा फोटो, पादुका, सटका घेऊन मिरवणूक द्वारकामाई मंदिरात येते़
मंदिरात आल्यानंतर फोटो प्रथम बाबांच्या बसण्याच्या शिळेवर ठेवला जातो़ भजनानंतर साई-विठ्ठलाचे फोटो पालखीत ठेवले जातात़ या पालखीची मिरवणूक काढण्यात येते़ मिरवणूक परत आल्यानंतर गुरूस्थान मंदिरासमोर भारुडाचा कार्यक्रम होतो़ त्यानंतर शेजारती होते़
सार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या स्वर्गीय ह़भ़प़लक्ष्मण महाराज वाकचौरे यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी शिर्डी-पंढरपूर वारीचा श्रीगणेशा केला़
वाकचौरे यांच्या पश्चात ह़भ़प़भास्कर महाराज गोंदकर यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे़ याशिवाय गेल्या सात वर्षापूर्वी ह़भ़पक़ाशिकानंद महाराज यांनीही साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व साईनिर्माण गु्रप यांच्या मदतीने शिर्डी-पंढरपूर वारी सुरू केली आहे़
विठ्ठल मूर्ती बसविण्यामागे साईबाबांची प्रेरणा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील रत्नपारखींच्या विठ्ठल मंदिरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ या मंदिरातील मूर्ती बसवण्यामागे साईबाबांची प्रेरणा होती, याच मंदिरात बसून संत दासगणूंनी जगभरातील साईभक्तांना भुरळ घालणाऱ्या ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीची निर्मिती केली होती़