शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरची काळी-पिवळीला धडक, १ ठार, ४ जखमी

By admin | Updated: March 21, 2017 02:03 IST

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरने रस्त्यावरील एका काळीपिवळीला धडक दिली.

देऊळगावराजा, दि. २0- दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून एका व्यक्तीने ट्रेलर चालकास बाहेर ओढले. या दरम्यान सदर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरने रस्त्यावरील एका काळीपिवळीला धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर चार जखमी झाले. हा अपघात २0 मार्च रोजी सायंकाळी स्थानिक अजिंठा गेस्ट हाऊस समोर घडला. सोमवारी सायंकाळी बस स्थानकासमोर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान एम.एच.२६ ए.डी. ६५८२ या मालवाहू ट्रेलरचा एका दुचाकीस धक्का लागला. त्यामुळे परमेश्‍वर नावाच्या व्यक्तीने सदर ट्रेलर चालकास खाली खेचले. यामुळे ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रेलर काळीपिवळी थांब्यावर उभी असलेल्या काळीपिवळी एम.एच.२८ एच 0७0१ क्रमांकाच्या काळीपिवळी व आयशर एम.एच.२१-६८९६ क्रमांकाच्या आयशरवर वर धडकला. यामुळे काळीपिवळी चालक शेख मुश्ताक, शिवाजी बाबुराव शेरे, नर्मदा छगनअप्पा बोंद्रे, शांताबाई मुरलीधर तायडे व मनिषा गिताराम जाधव गंभीर जखमी झाले. नागरिकांसह पोलिसांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य अधिकारी आकाश गोलांडे यांनी जखमीवर उपचार केले. उपचारादरम्यान शिवाजी बाबुराव शेरे रा.बोराखेडी बावरा (वय ४६) या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर उर्वरीत चारही गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले. ट्रेलर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकास चालत्या वाहनातून बाहेर खेचणार्‍या परमेश्‍वर नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.