शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

४४ संस्थांवर निलंबनाची तलवार !

By admin | Updated: September 10, 2015 02:13 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण सुरू; ३0 सप्टेंबर अंतिम मुदत.

बुलडाणा : जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या रडारवर असलेल्या अकार्यक्षम सहकारी संस्थांपैकी आतापर्यंत ४४ सहकारी संस्था अवसायानात काढण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. सहकार खात्याच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने १ जुलै २0१५ पासून जिल्ह्यातील १५६0 सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ द्वारे स्थळ सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकार क्षेत्रात सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे व संस्थांचे केवळ कागदोपत्री अस्तित्व कायम ठेवण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या संस्था सहकार विभागाच्या रडारवर आल्या होत्या. राज्यातील २ लाख ३0 हजार २९५ सहकारी संस्थापैकी जवळपास ४0 टक्के संस्था या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे सहकार खात्याच्या एका पाहणीमध्ये लक्षात आले. त्यानुसार १७ जून २0१५ रोजी सहकार खात्याने राज्यातील सर्वच सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण करायचे आहे. बुलडाणा जिल्ह्यात अधिकृत नोंद असलेल्या १५६0 सहकारी संस्थांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंध कार्यालय आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१च्या कार्यालयातील मिळून ५१ अधिकारी व कर्मचारी हे सर्वेक्षण करीत आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत आतापर्यंत ११२३ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ५0 टक्के संस्थांचे स्थळ सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या ११२३ सहकारी संस्थांपैकी जवळपास १0३0 सहकारी संस्था चालू स्थितीत आढळल्या, तर ४४ संस्था बंद होत्या. आता या ४४ संस्था थेट जिल्हा उपनिबंधकाच्या रडारवर आल्या असून, त्या अवसायनात काढण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. अवसायनाच्या कारवाईनंतर या संस्था बंद करण्याची कारवाई सहकार विभाग करणार आहे. विशेष म्हणजे, ज्या संस्थांच्या कामकाजाबाबत सहकार विभाग समाधानी नाही, अशा संस्थांवरही सहकार विभागाची बारीक नजर आहे. पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक चंद्रकांत दळवी यांनी १७ जून २0१५ रोजी निर्देश दिल्यानंतर ही कार्यवाही सुरू करण्यात आली. येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १५६0 संस्थांचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठवायचा आहे. दरम्यान, २0१३ पासून सहकार विभाग अंतर्गत येणार्‍या सर्व संस्थांची नोंदणी करण्यासोबतच त्यांचे ताळेबंद थेट ऑनलाइन ठेवण्याबाबत सहाकर खात्याने निर्देश दिले होते. या मोहिमेला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाल्याने जून २0१४ मध्ये त्यास मुदतवाढही देण्यात आली होती.