शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या

By admin | Updated: December 5, 2014 00:26 IST

कुटुंब नियोजनाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

बुलडाणा : कुटुंब नियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्ह्यात लागणारी पुरेशी यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टांचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. आधीच डॉक्टरांची कमतरता त्यात उपलब्ध डॉक्टरांवरच जास्तीच्या कामाचा बोजा पडत असल्यामुळे या राष्ट्रीय उपक्रमाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.दरवर्षी आरोग्य विभागाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिल्या जाते. या उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाला नियोजन करावे लागते. मार्च २0१४ पर्यंत जिल्ह्याला १३ हजार ३३९ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १0 हजार ६९३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यामुळे यावर्षीही उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य विभागाची दमछाक होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; मात्र या आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची कमतरता आहे. किमान एका आरोग्य केंद्रात एक आयुर्वेदिक व एक सर्जन असे दोन वैद्यकीय अधिकारी असावेत, असा नियम आहे; मात्र सध्या जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची केवळ ३५ पदे भरलेली असून, अध्र्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. जी पदे भरलेली आहेत त्यातील ५0 टक्के पदे ही आयुर्वेदिक डॉक्टरांची आहेत.