शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच

By सदानंद सिरसाट | Updated: May 1, 2025 23:14 IST

चालक वाहक तसेच बसमधील प्रवाशांना किरकोळ इजा

पिंपळगाव राजा (बुलढाणा): खामगाव-पिंपळगाव राजा मुख्य रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. या कामामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले असून याकडे प्रामुख्याने संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून तीन दिवसात तीन वाहने रस्त्याच्या खाली उलटली आहे. आज सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान खामगाव आगाराच्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस उलटली. यामध्ये चालक वाहक तसेच बसमधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली. त्यामुळे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाच्या कामाच्या कार्यप्रणालीवर प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला असून संबंधित प्रशासनाने काम करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराला सूचना देण्याची मागणी केली आहे.

खामगाव-पिंपळगाव राजा-तरवाडी या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून एका कंत्राटदाराने सुरु केले आहे.यां रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून मधला जुना डांबरी रोड खोदुन पूर्ण रस्त्याची लेव्हल करणे सुरु आहे, मात्र संबंधित कंत्राटदाराने एक बाजू पूर्ण खोदून टाकणे गरजेचे होते मात्र दोन्ही बाजू खोदल्याने पूर्ण रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला असून सर्वत्र बारीक खडेगोटे आढळून येत असल्याने दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात स्लिप होत असून अपघात होत आहे. दि. 29 एप्रिल रोजी ओमणी कार रोडच्या कडेला उलटले, तर आज एक टँकर रोडच्या कडेला उलटले तर आज सायंकाळी राज्य परिवहन खामगाव आगाराची एसटी बस उलटली, त्यामुळे राज्य परिवहन बस चे नुकसान झाले असून प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. यां रस्त्यावर काम सुरु असल्याने कर्तव्यावर असलेल्या सुपरवायझर यांच्याकडे अनेकांनी रस्त्याच्या कामाबाबत आपल्या तोंडी तक्रारी मांडल्या मात्र कुठल्याही वाहन धारकांचे तसेच प्रवाशांचे समाधान न करता सदर काम सुरु वेजबाबदार पणे सुरु आहे. त्यामुळे यां कामाबाबत प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून कंत्राट दारा विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी