शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र वैष्णव गडावर भाविकांची मांदियाळी!

By admin | Updated: July 5, 2017 00:18 IST

भाविक भक्तांना मंदिराच्यावतीने फराळ व चहाची मोफत व्यवस्था

काशिनाथ मेहेत्रे । लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र वैष्णव गडावर सानप गुरुजी यांच्या परिश्रमातून व जनतेच्या सहभागातून पंढरपूरच्या धर्तीवर प्रतिपंढरपूर रूक्मिणी-पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २ मार्च २०१७ रोजी संपन्न झालेली आहे. पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जातात; परंतु वारकरी संप्रदायामधील असंख्य भाविक भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही. अशा हजारो भाविक भक्तांनी ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वैष्णव गडावर सकाळी ६ वाजतापासूनच रूक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आलेल्या सर्व भाविक भक्तांना मंदिराच्यावतीने फराळ व चहा पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. आषाढी, कार्तीकी हेची आम्हा सुगी। शोभा पांडुरंगी घनवटे।। पंढरीची वारी आहे माझे घरी। अनिक न करी तीर्थ व्रत।। या अभंगाप्रमाणे आषाढ शुद्ध एकादशी व कार्तीकी एकादशी या दोन एकादशी वारकरी सांप्रदायामध्ये सणाप्रमाणे मानल्या जातात. सर्व वारकरी पंढरपूरची आषाढ शुद्ध एकादशी चुकवत नाही; पण ज्यांचं वय झालं, अडीअडचणीमुळे पंढरपूरला जावू शकत नाही, अशा भाविकांची निराशा होते. मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरात श्रीक्षेत्र वैष्णवगड येथे सानप गुरुजींनी परिश्रमातून व जनतेच्या सहभागातून पंढरपूरची प्रतिकृती उभारुन रूक्मिणी पांडुरंगाचे भव्य मंदिराची स्थापना केली. २ मार्च २०१७ रोजी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून, निव्वळ दगडी आहे. मंदिर बन्सी पहाडपूर या मार्बल दगडामध्ये बांधलेले असून, मंदिर बांधकामात लोखंड, लाकूड, किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. सदर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी सहा वाजतापासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली ती संध्याकाळपर्यंत सुरूच होती. जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधून भाविक गाड्या, घोड्याने तसेच दिंड्या घेऊन हरिनामाचा गजर करीत दर्शनासाठी वैष्णव गडावर आले होते. उपस्थित सर्व भाविकांना मंदिराच्यावतीने फराळ, चहा-पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी सानप गुरुजी यांचे श्रीहरिकीर्तन संपन्न झाले, तर चोहीकडे हरिनामाचा गजर सुरु होता. हजारो भाविकांनी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे वैष्णव गडाला पंढरपूरचे रूप आले होते.