शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: December 6, 2014 00:06 IST

बुलडाणा जिल्ह्यातील तीन अभयारण्यात मानवी हस्तेक्षप वाढला.

बुलडाणा : शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर या अभयारण्याची दैनावस्था होत असून, अभयारण्यातील मौल्यवान वनसं पदेसोबतच या अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर असे तीन अभयारण्य आहेत. मात्र, केवळ शासनाचे दुर्लक्ष, स्थानिक प्रशासनाची अनास्था आणि संबंधित विभागाकडे असलेली अपुरी साधने यामुळे या अभयारण्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत चालली आहे. या अभयारण्यात असलेल्या प्राणी तसेच पशुपक्षांची संख्या घटत चालली आहे. याला जबाबदार शासन असले तरी, संबंधित विभागामध्येच घरभेदी निघत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे ज्ञानगंगा अभयारण्य आहे. २0३५६.६0 हेक्टर क्षेत्रावर या अभयारण्याची व्याप्ती आहे. १२७११.२४ हेक्टरवर अंबाबारवा अभयारण्य तर सर्वात लहान २६६.00 हेक्टरवर लोणारच्या जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याच्या सरोवराजवळ संरक्षित वन आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे तीन तालुक्यांत पसरलेले असून खामगाव व बुलडाणा या दोन मोठय़ा शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर आहे. जंगलातील मोठय़ा प्रमाणावर मौल्यवान वनसंपदा नष्ट होत चालली आहे. वृक्षतोड व जंगलातील औषधोपयोगी वनस्पतीची तस्करी केल्या जाते. याबरोबरच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या हरिण, रोही, काळविट, मोर, रानडुक्कर, लांडोर यासारख्या पशुपक्षांच्या शिकारीमध्ये वाढ होत आहे. परिणामी, प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. अभयारण्यात माणसांचा वावर नसावा असा नियम असताना ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये आजही वस्त्या असलेली गावे आहेत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलाचं देणं धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. हीच स्थिती लोणार सरोवर परिसरातील संरक्षित वनाची आहे. एकूणच जिल्ह्यातील अभयारण्य व संरक्षित वनाची शासनाच्या दुर्लक्षामुळे पार वाट लागली असून येणार्‍या काळात ही वनसंपदा नष्ट होऊ देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.