शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांचा पाणी प्रश्न मिटला!

By admin | Updated: October 3, 2016 02:49 IST

मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सिंचन तथा पेयजलाचा प्रश्न मिटला आहे.

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २- पावसाळय़ाचे चार महिने संपून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असतानाच तालुक्यातील प्रकल्पांमध्ये जल साठवण होईल की नाही, अशी शंका असताना पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागायला सुरुवात झाली आहे. वरचेवर येणारा पाण्याचा ओघ पाहता धरणाच्या कॅनॉलचे गेट दोन इंच उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नळगंगा धरणात सोडण्यात येत आहे.जून ते ऑगस्टदरम्यान तालुकाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाने चांगली हजेरी लावली होती; मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरणारा पलढग लघू प्रकल्प यावर्षी भरेल की नाही, अशी शंका होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. दरवर्षी जुलै ते ऑगस्टच्या प्रारंभी हा तलाव भरून वाहत असतो; मात्र मागील चार महिन्यांपासून तालुक्यात पावसाचा ल पंडाव सुरू आहे. त्यामुळे नळगंगासह पलढग प्रकल्पात पाणी साठय़ाचे प्रमाण वाढत नव्हते; मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे पलढग प्रकल्पाचा पाणीसाठा शनिवारी सकाळपर्यंत ४00.१0 मीटरपर्यंत पोहोचला होता. शनिवारी दुपारपर्यंत पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा ४0३.१0 मीटरपर्यंत गेला व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. या प्रकल्पाची क्षमता ४0३.२0 मीटरची असून, संध्याकाळपर्यंत येणार्‍या काळात पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना पाटबंधारे विभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. *नळगंगा धरणात २९ टक्के जलसाठामागील आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नळगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरण २९ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात २४ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टांची आहे. सध्या धरणामध्ये २0 दलघमी पाणी साठा आहे. तालुकाभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सं ततधार पावसामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ६४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. असे असले तरी पावसाने सरासरी ओलांडली नाही.