शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यास मारहाणप्रकरणातील आरोपींना एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: October 15, 2014 00:44 IST

२0१२ मधील घटना; लोखंडी गज व कु-हाडीच्या दांड्याने केली होती मारहाण.

बुलडाणा : शेतातून परत येणार्‍या शेतकर्‍यास लोखंडी गजाने मारहाण करणार्‍या दोन आरो पींना एक वर्ष कारावासाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. सोनी यांनी सुनावली आहे. बुलडाणा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या दहिद बुद्रुक येथील रामकृष्ण उत्तमराव राऊत हे २९ सप्टेंबर २0१२ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातील कामकाज आटोपून घरी परत येत होते. त्याच वेळी गावातील आरोपी कौतिकराव काशीराम देवकर, गणेश काशीराम देवकर व काशीराम देवराव देवकर यांनी रामकृष्ण राऊत यांच्याशी वाद घालून त्यांना लोखंडी गज व कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केली. राऊत यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरु द्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप पवार यांनी मारहाण प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायालयात प्रविष्ट केले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. डी. सोनी यांनी आरोपी गणेश देवकर व काशीराम देवकर यांना प्र त्येकी एक वष्रे साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अँड. मो. बशीर मो. नशीर यांनी काम पाहिले.