शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतील गटबाजी अजित पवारांच्या दरबारात

By admin | Updated: December 6, 2014 00:08 IST

खामगाव येथील काँग्रेस भवन राष्ट्रवादीच्या ताब्यात

अनिल गवई / खामगाव ( बुलडाणा)लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घडाळ्याची टिकटिक कमालीची मंदावली आहे. या पराभवाचा कोणताही बोध राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेत नसल्याचे चित्र असतानाच शहरातील गटबाजी आता थेट अजित पवारांच्या दरबारात पोहोचल्याची खात्रीलायक माहिती आहे. परस्पर विरोधी गटांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.खामगाव शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटबाजीने पोखरल्या गेला आहे. गटा तटाच्या राजकारणात कुणीही माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची टिकटिक बंद पडली आहे. जिल्ह्यासह तालुका आणि खामगाव शहरातील पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही निष्ठावान पदाधिकार्‍यांनी प्रयत्न चालविले आहेत. खामगाव शहर राष्ट्रवादीतील गटबाजीला संपुष्टात आणण्याचे साकडे त्यांनी अजित पवारांना घातले. यावेळी गटबाजीमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानाचा पाढाच वाचण्यात आला. पक्ष रसातळाला नेण्यासाठी गटबाजी कशी कारणीभूत आहे, याची तंत्रशुद्ध माहिती आकडेवारीसह अजित पवारांकडे देण्यात आली. त्यामुळे गटबाजीला वेसण घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वाने प्रयत्न चालविल्याचे समजते. पुढे ही गटबाजी कोण त्या स्थराला जाते, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.