शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

मिशन अँडमिशन

By admin | Updated: June 20, 2014 00:18 IST

विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार आहे.

बुलडाणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. २६ जून रोजी गुणपत्रिका हातात आल्यावर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभाग (माध्यमिक) यांनी वेळापत्रकच तयार केले असून, जिल्ह्यात अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य, संयुक्त शाखेच्या एकूण २४ हजार २४२ जागा आहेत. बुलडाणा शहरात दरवर्षी नामांकीत अशा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक प्रवेशासाठी गर्दी करतात. पालकांनी व विद्यार्थ्यांनी केवळ एकाच महाविद्यालयावर विसंबून न राहता दोन ते तीन कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश अर्ज भरावेत, या सोईसाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकच तयार केले आहे. जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील ४१२ तुकड्यांमध्ये प्रवेशाचे नियोजन आखण्यात आले असून, आता शहरात विद्यार्थी आणि पालकांचे ह्यमिशन अँडमिशनह्ण सुरू होणार आहे.

** प्रत्येक तुकडीत ८0 विद्यार्थी

नियोजनानुसार प्रत्येक मंजूर तुकडीमध्ये ८0 विद्यार्थी नियमानुसार प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिक्षण विभाग(माध्यमिक) यांनी तयार केलेल्या अकरावी प्रवेशाच्या नियोजनात कला शाखेसाठी २२४ तुकड्यांमध्ये ११५२१ जागा, विज्ञान शाखेसाठी १३६ तुकड्यांमध्ये ९३१३ जागा, वाणिज्य शाखेत ३३ तुकड्यांमध्ये १७९५ जागा तर संयुक्त शाखेच्या १८ तुकड्यांमध्ये १६१३ जागांसाठी नियोजन शिक्षक विभागाकडून करण्यात आले आहे.

** क्लासेसचे कॉलेजसोबत सेटींग

बारावीच्या परीक्षेवर पुढील भविष्य अवलंबून असल्यामुळे दहावीनंतर थेट बारावीचेच प्लॅनींग केले जाते, त्यामुळे आपल्या पाल्याला कुठल्या क्लासेसमध्ये टाकायचे, हे ठरविले की मग त्या क्लासेसने सांगितलेल्याच विशिष्ट कॉलेजमध्ये ११ वीसाठी प्रवेश घेतला जातो. क्लासेस आणि कॉलेजचे सेटींग असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्याची गरज भासत नाही. सर्व शिक्षणक्रम हा क्लासेसमध्येच पूर्ण करून घेतला जात असल्याने अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या केवळ पटावरच असते.

** व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही पसंती

कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबतच तंत्रनिकेतन तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध ट्रेडसाठीसुद्धा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बुलडाण्यात १३ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, यामध्ये असलेल्या विविध ट्रेडमधील विद्यार्थी संख्यांची र्मयादा अद्यापपर्यंत आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन-तीन दिवसात जागांची मंजुरात आल्यावर २६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू होणार असल्याची माहिती आहे.