शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुराच्या आत्महत्येने उभे केले अनेक प्रश्न

By admin | Updated: December 5, 2014 00:23 IST

देऊळगाव साकर्शा येथील शेतमजूराची आत्महत्या; कुटुंब झाले सैरभैर.

ब्रह्मनंद जाधव / मेहकर (बुलडाणा)नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून राज्यभर शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. प्रशासनही शेतकरी आत्महत्येचा अहवाल तयार करून त्यांना मदत देत आहे; परंतु आता शेतकर्‍यांच्या पाठोपाठ शेतमजुरांनीही आत्महत्येचा उंबरठा ओलांडला आहे. तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील एका शेतमजुरानेच आत्महत्या केल्याने त्याला मदत देण्यासाठी नानाविध प्रश्न प्रशासनासमोर उभे ठाकले आहेत. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंब सैरभैर झाले असून, या कुटुंबीयाला मदतीत बसविण्यासाठी प्रशासनही विविध योजना उकरून काढत आहे.अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी शासनस्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी आत्महत्या होताच पूर्ण महसूल विभाग कामाला लागतो. त्यासाठी तहसीलदार, तलाठी सदर शेतकर्‍याच्या सातबारासारख्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करून, शेतकर्‍याच्या आत्महत्येचा अहवाल शासनाकडे पाठवितात. त्यानंतर काही दिवसातच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबीयाला शासनाची आर्थिक मदतही मिळते. आता शेतकरी आत्महत्येच्या पाठोपाठ शेतमजुरांनीही आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे.